अपहृत अभियंत्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न

0
काबूल : अफगाणिस्तानमध्ये अपहरण झालेल्या सात भारतीय अभियंत्यांच्या सुटकेसाठी स्थानिक कबाली सरदारांची मदत घेण्यात येत आहे. रविवारी तालिबानी बंदुकधार्‍यांनी सात भारतीय अभियंत्यांचे उत्तर बाघलान प्रांतातून अपहरण केले होते. या प्रकरणी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केली आहे. प्रांतीय पोलिस प्रवक्ता जबीउल्ला शूजा यांनी सांगितले की, आरपीजी समूहाची कंपनी केईसी इंटरनॅशनलचे भारतीय अभियंते एका वीज उपकेंद्र निर्मिती योजनेवर काम करत होते. सर्व सात अभियंते रविवारी प्रकल्पाच्या ठिकाणी जात होते. चश्मा-ए-शीर भागात दहशतवाद्यांनी त्यांचे अपहरण केले. या अभियंत्यांना घेऊन जाणारा अफगाणी चालकदेखील बेपत्ता आहे. या अभियंत्यांच्या सुटकेसाठी अफगाण सुरक्षा दल, सरकारी अधिकारी आणि स्थानिक कबाली सरदार प्रयत्न करत आहेत.