रायपूर : छत्तीसगडमधील दंतेवाडात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सहा जवान शहीद झाले आहेत. नक्षलवाद्यांनी दंतेवाडा येथील छोलनार गावात भूसुरुंग लावून जवानांची गाडी उडवली. यामध्ये पाच जवानांचा जागीच, तर एका जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आणखी एक जवान जखमी आहे.
Chhattisgarh: 3 jawans of Chhattisgarh Armed Force & 2 jawans of District Force killed and 2 jawans injured in an IED blast on a police vehicle in Dantewada's Cholnar Village. Troops of CRPF rushed to the spot, More details awaited. pic.twitter.com/J6a0JMpknn
— ANI (@ANI) May 20, 2018
शहीद झालेल्या जवानांमध्ये छत्तीसगड सशस्त्र बलाच्या आणि जिल्हा पोलीस दलाच्या जवानांचा समावेश आहे. माहिती मिळताच सीआरपीएफने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरु केले. दरम्यान, यापूर्वीही सुकमा जिल्ह्यात सर्च ऑपरेशन करत असलेल्या जवानांवर अशाच प्रकारे हल्ला करण्यात आला होता, ज्यामध्ये नऊ जवान शहीद झाले होते. अगोदर आयईडी ब्लास्ट करण्यात आला आणि नंतर जवानांवर गोळीबार करण्यात आला. छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त भागात गेल्या काही दिवसांपासून पोलीस आणि सीआरपीएफकडून संयुक्त सर्च ऑपरेशन चालू आहे. याचदरम्यान नक्षलवादी जवानांवर हल्ला करत आहेत.