सहा महिन्‍याच्‍या चिमुकला वाचला पण दोघांचा मृत्यू

जनशक्ती न्यूज | jamner accident | दोनच दिवसांपूर्वी जामनेर तालुक्यातील गारखेडा तेथे आयशर व रिक्षाच्या अपघातात चार ठार झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा आयशर व कारचा अपघात झाला. यात देखील दोघांचा जागीच मृत्‍यू झाला आहे.तर अन्‍य तिन जण जखमी आहेत. यात सहा महिन्‍याच्‍या चिमुकल्‍याचा समावेश आहे.

जामनेर तालुक्यातील टाकळी गावाजवळ ट्रक आणि कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात कारमधील दोन जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

जिल्ह्यातील अपघातांची मालिका काही केल्या खंडित होत नसल्याचे पाहायला मिळत आहे. भुसावळ येथील नागरिक पाचोराच्या दिशेने लग्नकार्यासाठी कारने (क्र. एमएच १८ डब्ल्यू २४१२) निघाले होते.