दिघी पोलीस ठाण्यातील सहा पोलीस निलंबित!

0

दिघी : जुगार अड्ड्यावर छापा टाकून जप्त केलेली रक्कम पोलीस ठाण्रात जमा न करता स्वतचा फायद्यासाठी वापल्या प्रकरणी आणि आरोपींकडून लाच स्वीकारल्या दिघी पोलीस ठाण्यातील सहा पोलिसांना बुधवार 5 रोजी पुणे पोलीस आयुक्तांनी निलंबित केले. निलंबित करण्यात आलेल्यामध्ये सहाय्यक निरीक्षक, पोलीस नाईक आणि पोलीस शिपाई अशा सहा जणांचा समावेश आहे. हा प्रकार ऑक्टोबर 2016 मध्रे डुडुळगाव रेथे घडला होता.

यांच्यावर कोसळली निलंबनाची कुर्‍हाड
दिघी पोलीस ठाण्राचे सहाय्रक पोलीस निरीक्षक संतोष काटे, पोलीस नाईक सोमनाथ बाबासाहेब बोर्‍हाडे, नामदेव खेमा वडेकर, विपूल लंकेश्‍वर होले, शिवराज भगवंत कलांडीकर व पोलीस शिपाई परमेश्‍वर तुकाराम सोनके अशी निलंबित करण्रात आलेल्रा पोलिसांची नावे आहेत. कर्तव्य पार पाडत असताना केलेला गंभीर गैरप्रकार, भ्रष्टाचार व वैयक्तिक फायद्यासाठी गैरवर्तन केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने पुणे पोलीस आयुक्तांनी या सहा जणांच्या निलंबनाचे आदेश काढले.

89 हजार रुपये हडपले
सेवेतून निलंबित करण्रात आलेल्रा पोलिसांनी 8 ऑक्टोबर 2016 रोजी डुडुळगाव रेथे एका जुगाराच्रा अड्ड्यावर छापा टाकला होता. छापा टाकल्यानंतर त्या जुगार अड्ड्यावर जुगार खेळणार्‍रा लोकांना अटक करून पोलीस ठाण्रात आणण्रात आले होते. परंतु त्रांच्रावर वरील पोलिसांनी कोणतीही कारदेशीर कारवाई केली नाही. कारवाई दरम्रान 89 हजार रुपरांची रक्कम जप्त करण्यात आली होती. जप्त करण्रात आलेली रक्कम पोलिसांनी स्वत:च्रा फारद्यासाठी वापरली. तसेच अटक करण्रात आलेल्रा आरोपींकडून कारवाई करण्राची भीती दाखवून 25 हजार रुपरांची लाच स्वीकारली होती.

चौकशी सत्यता समोर
या प्रकरणाची कुणकुण लागल्यानंतर वरिष्ठांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार, दिघी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस नाईक व पोलीस शिपाई अशा सहा जणांची चौकशी करण्यात आली. या चौकशीत त्यांनी डुडुळगाव येथील जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकून जप्त केलेल्या पैशांची हेराफेरी केल्याचे तसेच आरोपींकडून लाच घेतल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, पोलीस आयुक्तांनी या प्रकरणात दोषी असलेल्या पोलिसांच्या निलंबनाचे आदेश काढले.