काल दिनांक 15 रोजी विज मंडळांनी विजेच्या तारांना अडथळा आणणारे व तारांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या फांद्या काही ठिकाणी छाटल्या जात आहेत . आमच्याही शाळेतील वडाच्या फांद्या वीजतारांना स्पर्श करत होत्या त्या छाटल्या व त्या तशाच पडून होत्या त्या फांदया बघितल्यावर मनाला दुःख झाले . वाईट वाटले . या फांद्याचे काय करावे यातील छोट्या नाजूक फांदया या पुर्नवापर करता येतो मागे तशी दोन रोपे तयार करून जगवलेली होती तो विचार करून मी त्या वडाच्या फांद्या त्यातून लावण्या योग्य छोट्या छोट्या फांद्या यांना तोडून त्यांचा वापर पुन्हा रोप बनवण्यासाठी केला . मागील वर्षी रोपवाटिका शाळेतच विद्यार्थ्यांच्या सहकार्याने 650 झाडांची रोपवाटिका तयार केली होती व त्यातील विविध रोपे विविध प्रसंगी त्याचे वाटपही केले होते त्यातील काही रोपे मे महिन्यात सुकल्यामुळे त्याच पिशव्या व मातीचा वापर आता केला आणि त्या वडाच्या फांद्या लावून जवळपास 145 रोपे काल तयार केले.
एकीकडे वृक्षांचा ऱ्हास होत असताना वृक्षतोड वाढत आहे .ज्या ठिकाणी गरज असेल त्या ठिकाणी वृक्षतोड होणे आवश्यक आहे पण वृक्ष लावणे जोपासणे संवर्धन करणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे ज्या ज्या वेळी वड पिंपळ औदुंबर तोडण्याचा किंवा छाटण्याची वेळ असेल त्या त्या वेळी ते तोडण्याच्यापूर्वी त्या फांद्यांचा दुसरीकडे लावण्याचा बंदोबस्त किंवा व्यवस्था केली तर ते एका झाडापासून असंख्य झाडे तयार होऊ शकतात कमी कालावधीत झाडे उंच होऊ शकतात आणि विशेष करून जास्त ऑक्सीजन देणारी झाड ही फांद्यांच्या माध्यमातून जगू शकता काल पडलेल्या वडाच्या फांद्या इतरत्र बघून वाईट वाटले आणि भर दुपारी सुकलेला रोपांच्या पिशव्यातली माती व इतर ठिकाण आणलेली माती एकत्र करून शुभस्य शीघ्रम कामाला सुरुवातही केली .टाकाऊतून टिकाऊ व त्यातूनच सुजनशीलता असावी .ज्या ज्या भागात वड पिंपळ ची छाटणी होत असेल तर अशा वृक्षांची लगेच रोपवाटिका किंवा रोप तयार केले तर ती लवकर जगतात व त्या फांद्या वायाही जात नाही . वृक्ष तोडू नका परंतु त्या तोडलेल्या वृक्षांचा पुनर्वापर जर केला तर वृक्ष संवर्धनाला खूप मोठी चालना मिळेल .असं काम करताना लोक वेडा म्हणतात .म्हणू द्यावे आपण आपलं काम करत राहावे.
ऑफ तासाच्या वेळेला विद्यार्थिनींना याचं महत्त्व असाव त्यांनाही अशा वाया जाणाऱ्या झाडांच्या फांद्या चा वापर करता यावा म्हणून विद्यार्थिनांना ही घेऊन सुद्धा काही रोप कशी तयार करावी पिशव्या कशा भराव्यात या संदर्भातही प्रशिक्षण दिलं विद्यार्थिनींना या गोष्टींचा आनंद झाला नवीन काही शिकण्याचा अनुभव त्यांना आला .
नाना शंकर पाटील
कार्याध्यक्ष
पर्यावरण सागर प्रतिष्ठान महाराष्ट्र
ब्रँड अँबेसेडर नगरपरिषद भुसावळ