स्मार्टफोन खरेदीत लक्षणीय वाढ

0

नवी दिल्ली– आज कुटुंबातील किमान दोन व्यक्तीकडे स्मार्टफोन आहे. त्यामुळे सलग तिसऱ्या वर्षी स्मार्टफोन खरेदीत तब्बल १९ टक्केपर्यंत वाढ झाली आहे. तसेच स्मार्टफोनची सरासरी विक्री किंमत (एएसपी) वाढली. यावरून बाजारात स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढलेली दिसून येते. इंटरनॅशनल डेटा कार्पोरेशन (आयडीसी) इंडिया आणि काउंटरपॉइंट रिसर्चने केलेल्या निष्कर्षांनुसार 2016 च्या तुलनेत 2017 दरम्यान एएसपीमध्ये अनुक्रमे १६ टक्के आणि १९ टक्के अनुक्रमे 157 डॉलर आणि 144 डॉलरची वाढ झाली. 2016 मध्ये, कित्येक वर्षांत घट झाली असली तरी एएसपीमध्ये अनुक्रमे सुमारे 135 आणि 122 डॉलर्स इतकी सौम्य होती.