हत्या झालेल्या कार्यकर्त्याच्या मृतदेहाला स्मृती इराणींनी दिला खांदा !

0

अमेठी: भाजप नेत्या स्मृती इराणी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अमेठीतील बारौली येथील माजी सरपंच सुरेंद्र सिंह यांची काल रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली. दरम्यान आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी स्मृती इराणी यांनी त्यांच्या मृतदेहाला खांदा दिला. सुरेंद्र सिंह हे स्मृती इराणी यांचे अगदी जवळचे मानले जात होते. स्मृती इराणी यांच्या विजयासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले होते. दरम्यान त्यांच्या हत्येप्रकरणी ७ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची चौकशी सुरु आहे.