शिरपूर प्रतिनिधी ।
शिरपूर तालुका पोलिसांनी इंदूरहून धुळ्यात होणारी गुटखा, तंबाखूची होणारी तस्करी नाकाबंदी करीत दहिवद व हाडाखेड शिवारातच रोखली. दोन ट्रकसह एकूण ८३ लाखांची तंबाखू जप्त करण्यात आली. मध्यरात्री आणि पहाटेच्या सुमारास या कारवाई करण्यात आल्या.
ट्रकमधून (क्र. के ए ०१ ए जे ००१५) महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असणारी सुगंधीत तंबाखू इंदूरकडून धुळयाकडे नेली जात असल्याची गोपनीय माहिती सपोनि सुरेश शिरसाठ यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकासह मुबई- आग्रा महामार्गावरील दहिवद गावजवळील छत्रपती हॉटेल समोर नाकाबंदी केली. मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास संशयीत ट्रक येताना दिसले. त्या ट्रकला पोलीसांनी हात देवून थांबवले. चालकास वाहनामधील मालाबाबत विचारले असता तो समाधान कारक उत्तर देत नसल्याने वाहन पोलीस ठाणे आवारात आणण्यात आले. तसेच त्यांनतर पुन्हा गुप्त माहितीवरून दुसऱ्या एका ट्रकला (क्र. के ए०१ ए जे २७७६) हाडाखेड सिमा तपासणी नाका येथे नाकाबंदी करुन पहाटे ४ वाजता पकडण्यात आले…
या ट्रकवरील चालक देखील समाधान कारक उत्तर
देत नसलयाने वाहन पोलीस ठाणे आवारात आणण्यात आले. दोन्ही वाहनाची तपासणी केली असता त्यात तंबाखूचा माल आढळून आला. के ए०१- एजे ००१५ ट्रकवरील चालक किशोर राव एन नागेद्रराव (वय ३१ रा. पुढील कायदेशीर कार्यवाई सुरू आहे. रेल्वे कम्पाऊन्ड मपाडी रोड बँगलोर नॉर्थ, कर्नाटक) यास ताब्यात घेत या ट्रकमधून ३३ लाख ६० हजार रुपये किंमतीची रत्ना ३००० कंपनीच्या तंबाखुचे एकूण २८० बॉक्स व १५ हजार लाखांचा ट्रक तसेच दुसऱ्या कारवाईत ट्रकवरील (क्र. के ए०१ ए २७७६) चालक मंजू रोक्कडदम चन्नाप्पा (वय ३३ रा. चन्नाप्पा एन.ए. प्लॉट मदान भावी धारवाड, कर्नाटक) याला ताब्यात घेत या ट्रकमधून १२ लाखांची रत्ना ३००० कंपनीची तंबाखूचे एकूण १०० बॉक्स व ७ लाख ६४ हजार ४०० रुपये किंमतीची प्रभात ३१० कंपनीच्या तंबाखूचे ६५ बॉक्स व १५ लाखांचा ट्रक अशा दोन्ही वाहनांसह एकूण ८३ लाख २४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. धुळे येथील अन्न व औषध प्रशासन कार्यालय यांना लेखी पत्र देवून ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे व प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी अंसाराम आगरकर यांच्या मार्गर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सपोनि सुरेश शिरसाठ, पोसई संदीप पाटील, पोसई कृष्णा पाटील, पोहेकॉ संजय सूर्यवंशी पोना संदीप ठाकरे, पोकॉ रोहिदास संतोष पावरा, मनोज पाटील, संतोष पाटील, इसरार जकाउल्ला फारुकी, कृष्णा पावरा, मुकेश पावरा योगेश मोरे यांच्या पथकाने केली आहे.