सामाजिक कार्यकर्ता महेश शंकरपेल्ली यांनी आज ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री मनीष कलवानिया यांना सशस्त्र पोलीस संरक्षण देण्याची मागणी
सामाजिक कार्यकर्ता महेश शंकरपेल्ली यांनी आज ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री मनीष कलवानिया यांना महाराष्ट्र शासन गृह विभाग शासन निर्णय दिनांक 27 फेब्रुवारी 2013 अनुसार सशस्त्र पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली. शंकरपेल्ली यांना तात्काळ पोलीस संरक्षण द्यावे व त्यांच्यावरील दाखल केलेल्या खोट्या गुन्हामध्ये योग्य ती न्याय सांगत कार्यवाही करावी. अशी मागणी सिल्लोड शहरातील सर्वपक्षीय नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच प्रतिष्ठित नागरिकांनी केली.
पोलीस अधीक्षक यांच्याकडे जालना विधानसभा आमदार श्री कैलास किसनराव गोरंट्याल, ईद्रिस मुलतानी, सुरेश बनकर, ज्ञानेश्वर मोठे, बन्नेखां पठाण, कमलेश कटारिया, सुनील मिरकर, विष्णू काटकर, मुक्तार बागवान, भगवान जीवरग, शकील पठाण, ॲड. शेख उस्मान, विठ्ठल बदर, अजबराव मानकर, संदीप गुडे, रमेश पाटील, राहुल कुमार ताठे, फिरोज शेख, फईम पठाण, अजिंक्य ढोकळे, शेख शफीक इत्यादी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.