लेकींच्या सन्मानासाठी #भाग्यकीलक्ष्मी मोहीम सुरु करा; मोदींचे आवाहन

0

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आज मन की बात’द्वारे देशावासियांशी संवाद साधला. यावेळी मोदींनी विविध विषयांवर चर्चा केली. दरम्यान नारीशक्तीच्या सन्मानासाठी मोदींनी सोशल मीडियावर #भाग्यकीलक्ष्मी मोहीम सुरु करण्याचे आवाहन केले. विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या कार्याबाबत माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून द्यावे त्यासाठी #भाग्यकीलक्ष्मीचा वापर करण्याचे आवाहन मोदींनी केले. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, न्याय क्षेत्रासह अनेक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्याचा हा मार्ग असल्याचे मोदींनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या ‘मन की बात’च्या माध्यमातून देशातील जनतेशी संवाद साधत आहेत. पंतप्रधानांनी मन की बातच्या सुरुवातीलाच नवरात्रोत्सव, छटपूजा, दसरा आणि दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. जाणून घेऊयात पंतप्रधान मोदी काय म्हणताहेत…

ई-सिगरेट धोकादायक आहे, त्यापासून सावध राहण्याचे आवाहन मोदींनी तरुणांना केले आहे. २ ऑक्टोंबरपासून देशात प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे, त्यासाठी प्लास्टिकमुक्त भारताच्या अभियानात सामिल होण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे.