यावल ( प्रतिनिधी )जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय महाविद्यालयात प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली थोर क्रांतिकारक लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णा भाऊ साठे जयंती विद्यार्थी विकास विभागातर्फे साजरी झाली.
कार्यक्रमात उपप्राचार्य प्रा.ए पी पाटील,प्रा. एस.डी पाटील उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. संतोष जाधव यांनी लोकमान्य टिळक यांच्याबद्दल माहिती देताना जहाल मतवादी युग, पत्रकारिता, शैक्षणिक कार्य, समाज प्रबोधनात्मक कार्य याबद्दल माहिती दिली व अण्णा भाऊ साठे यांच्या बाबतीत अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजाला जागृत करतांना लावणी, पोवाडा,कथा, कादंबरी, वगनाट्य ग्रंथसंपदा यातुन वाचा फोडली. अण्णाभाऊ साठेंचा मार्क्सवादी विचार यावर विवेचन केले.
प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी अध्यक्षीय भाषणातून लोकमान्य टिळक भारताचे स्वातंत्र्य विषयक विचार व अण्णा भाऊ साठे यांच्या बाबतीत संयुक्त महाराष्ट्र चळवळ यावर सखोल मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. हेमंत भंगाळे, डॉ. एस. पी. कापडे, डॉ.आर. डी. पवार, प्रा. प्रा.मनोज पाटील, प्रा. एकनाथ सावकार, प्रा. डॉ. पी. व्ही. पावरा, प्रा. सी. के. पाटील, प्रा. आर. एस. तडवी, प्रा.मुकेश येवले, उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.सुभाष कामडी केले, सूत्रसंचालन प्रा.सौ. पी. व्ही. रावते यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा.छात्रसिंग वसावे यांनी मानले. कार्यक्रमात बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.