डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वकीलीच्या शताब्दी निमित कल्याण येथे ॲड.उमाकांत घोडराज यांना “सोल्जर ऑफ कॉन्स्टिट्यूशन पुरस्कार प्रदान 

शहादा:-

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वकीलीच्या शताब्दी निमित्त दि.२८जुलै २०२३ रोजी कल्याण येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे “ऑल इंडिया फेडरेशन ऑफ ॲडव्होकेटस् अँड असोसिएशन्स, न्यू दिल्ली यांचेकडून असोसिएशनस् चे अध्यक्ष ॲड.रवी प्रकाश जाधव,वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड.प्रकाश राजाराम जगताप यांनी उत्कृष्ट वकिली करणाऱ्या देशातील १०१ वकिलांना “सोल्जर ऑफ कॉन्स्टिट्यूशन” पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले त्यात “सोल्जर ऑफ कॉन्स्टिट्यूशन पुरस्कार धुळे येथील जिल्हा व सत्र न्यायालयात व शहादा येथील न्यायालयात वकिली व्यवसाय करणारे धुळे जिल्हा वकील संघाचे कार्यकारणी सदस्य ॲड.उमाकांत घोडराज यांना उत्कृष्ट वकील म्हणून “सोल्जर ऑफ कॉन्स्टिट्यूशन” पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

कर्नाटक, झारखंड, दिल्ली, उत्तरप्रदेश, राजस्थान, तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्हातील एकूण १०१ उत्कृष्ट वकिली करणाऱ्या वकील बंधू-भगिनींचा सोल्जर ऑफ कॉन्स्टिट्यूशन या पुरस्काराने सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वकीली विषयी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार दिनांक २८/०७/२०२३ रोजी आचार्य प्रल्हाद केशव अत्रे नाट्यमंदिर,शिवाजी चौक कल्याण (प.)येथे सकाळी १०.०० ते सायं. ६.३० वाजे दरम्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमास

प्रमुख पाहुणे व वक्ते ॲड.ए.एस.गजानन चव्हाण (मा.अध्यक्ष, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा) ॲड.गोपाळ भगत (उल्हासनगर) ॲड.खरात (सोलापूर)ॲड.राजेश झाल्टे (जळगांव)ॲड.प्रशांत बाविस्कर (जळगाव) ॲड.सत्य प्रकाश गौतम (दिल्ली) ॲड.मदनलाल कलकल (दिल्ली)ॲड.राजकुमार भारत (औरंगाबाद) ॲड.अनिल वैद्य (मा.न्यायाधिश)ॲड.राहुल मखरे (पुणे)ॲड.संजय मोरे (सरकारी वकील) ॲड.रोशन लाल (दिल्ली)ॲड.संघराज रुपवते (मुंबई), ॲड.वासवाणी (मुंबई)ॲड.रंजना भोसले (पुणे) ॲड.गुलाबराव अवसरमल (मा. न्यायाधिश),ॲड.विलास नाईक (अलिबाग) ॲड.डॉ.डि.के.सोनवणे (मा.न्यायाधिश) ॲड.जयमंगल धनराज (मुंबई) ॲड.डॉ. रमेश राठोड (नागपूर) ॲड.प्रेमनाथ पवार (नाशिक)ॲड.किरण चन्ने (भिवंडी) ॲड.बबनराव बनसोडे (कल्याण) अँड.मंजू खोब्रागडे (कल्याण)ॲड.सुहास रावळे (परभणी)ॲड.धनंजय पाटील (कळवण) ॲड.शंकर रामटेके (कल्याण)आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटनेचे वकील बंधू भगिनींचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यावर आधारीत शिवसोहळा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजी यांच्यात झालेल्या पुणे करारावर आधारित “द स्पिरीट ऑफ बाबासाहेब ” या एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटनेचे सदस्य ॲड.डॉ.सुनिल नागेश भालेराव यांनी केले.सदर कार्यक्रमात देशभरातून वकील बंधू भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते.