नवी दिल्ली-केंद्रीय आरोग्य मंत्रालय ३४३ औषधांवर बंदी घालण्याची शक्यता आहे. यात सर्वसाधारण घेतल्या जाणाऱ्या डिकोल्ड टोटल, सॅरिडॉन, फेंन्सेडिल यासारख्या औषधांचा समावेश आहे. वेदनाशामक आणि फ्लू शी संबंधित औषधांवर बंदी येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. ही औषधे फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (FDC) औषधे आहेत असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. या औषधांवर बंदी घातली जावी म्हणून एका केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या एका उप समितीने शिफारस केली होती. ही शिफारस मान्य करून या औषधांवर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे.
सरकारने हा निर्णय घेतला तर पिरामल, मॅक्लिऑड्स, सिपला, ल्युपिन यांसारख्या औषध बनवणाऱ्या कंपन्यांना त्याचा फटका बसणार आहे. कदाचित या कंपन्या सरकारच्या या निर्णयाविरोधात न्यायायलयात जाऊ शकतात.
सुप्रीम कोर्टाने डीटीएबीला सांगितले होते की आरोग्य मंत्रालयाला ही यादी सोपवा की कोणती औषधे रेग्युलेट, रेस्ट्रिक्ट किंवा पूर्ण बंद करायची आहेत. त्यानुसार ३४३ औषधांची नावे डीटीएबीने दिल्याचे समजते आहे. फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन अर्थात एफडीसी औषधांवर बंदी घालण्यात यावी असा मुद्दा केंद्राने उपस्थित केला. कंपन्या आणि सरकार यांच्या वादात सुप्रीम कोर्टाने डीटीएबीला औषधांची यादी तयार करण्याची सूचना दिली आहे.