‘भारत माता की जय’ न म्हणणाऱ्यांचे डीपॉझीट जप्त व्हायला पाहिजे: मोदी

0

दरभंगा:पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहारमधील दरभंगा येथे लोकसभा निवडणुकीसाठी प्रचारसभा घेत आहे. यावेळी त्यांनी कॉंग्रेससह विरोधकांवर टीकास्त्र सोडले. देशात राहुल देशातील काही नेत्यांना भारत माता की जय, वंदे मातरम् म्हणायची लाज वाटते. जे कोणी भारत माता की जय, वंदे मातरम् म्हणत नसतील त्यांचे डीपॉझीट जप्त व्हायला पाहिजे असे मोदींनी सांगितले.

पाकिस्तानची बाजू घेणारी लोक आता मोदी आणि ईव्हीएमला दोष देत आहेत. या लोकांना जनतेच्या भावना समजत नाहीत. आता मतदारांनी तीन टप्प्यात झालेल्या मतदानातून त्यांना योग्य तो संदेश दिला आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला. महामिलावट करणारी लोक सांगतात की दहशतवाद हा महत्त्वाचा मुद्दा नाही. दहशतवादाने श्रीलंकेत ३५० लोकांचे प्राण घेतले, मग हा महत्त्वाचा मुद्दा ठरत नाही का? आपल्या शेजारी दहशतवाद्यांची फॅक्टरी सुरु आहे, असे त्यांनी म्हटले आहे.