‘या’ राज्यांमध्ये उघडली शाळा; अशी घेतली जातेय खबरदारी

0

नवी दिल्ली: कोरोना या जागतिक महामारीमुळे देशभरातील शाळा, महाविद्यालये गेल्या सात महिन्यांपासून बंद होती. देशात आता अनलॉकची प्रक्रिया सुरु आहे. अनलॉकच्या माध्यमातून हळूहळू सर्व सुरु करण्याचा प्रयत्न सुरु आहे. दरम्यान नोव्हेंबरपासून काही राज्यांमध्ये शाळा पुन्हा सुरु झाल्या आहेत. आंध्रप्रदेश आणि आसाम राज्यात सात महिन्यानंतर शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. आंध्रप्रदेशमध्ये ९ आणि दहावीचे वर्ग सुरु करण्यात आले आहे तर आसाममध्ये ६, ७, ८ वीचे वर्ग सुरु करण्यात आले आहे. कोरोनामुळे घालून देण्यात आलेल्या नियमावलींचे पालन करून शाळा सुरु करण्यात आल्या आहेत.

दर तासाला १५ मिनिटांचा ब्रेक घेऊन वर्ग खोली निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना दर तासाला हात धुण्याबाबत सुट्टी दिली जाणार आहे. मास्क अनिवार्य आहे, या सगळ्या बाबींची अंमलबजावणी करण्यात येऊन शाळा सुरु करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रात दिवाळीनंतर शाळा सुरु करण्याचे मानस आहे.