अक्कलकुवा ः दारू पिण्यासाठी पैसे न देणार्या पित्याचा मुलानेच खून केला. तालुक्यातील रांझणी येथे ही घटना घडली. या प्रकरणी अक्कलकुवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पित्याचाच केला खून
अक्कलकुवा तालुक्यातील रांझणी येथे राहणार्या यशवंत दसर्या पाडवी यांचा मुलगा राकेश यशवंत पाडवी याने दारू पिण्यासाठी पैसे मागितले मात्र यशवंत दसर्या पाडवी यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने त्याचा राग येऊन राकेश पाडवी याने यशवंत दसर्या पाडवी (25) यांना काठीने मारहाण केली. यात यशवंत पाडवी यांचा मृत्यू झाला.
मुलाविरोधात खुनाचा गुन्हा
याप्रकरणी आकाश यशवंत पाडवी (रा.रांझणी, पो.रायसिंगपूर. ता.अक्कलकुवा) यांच्या फिर्यादीवरून अक्कलकुवा पोलिस ठाण्यात राकेश यशवंत पाडवी (रा.रांझणी) याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास राजेश गावीत करीत आहेत.