राम कदम पुन्हा संकटात; अभिनेत्री सोनाली बेंद्रेला ट्विटरवर केले मृत घोषित

0

मुंबई-गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या भाजप आमदार राम कदम यांच्या संकटांमध्ये आता नव्याने भर पडली आहे. परदेशात उपचारासाठी गेलेल्या अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या निधन झाल्याचे ट्विट त्यांनी केलं.

‘हिंदी व मराठी सिनेसृष्टीतली अभिनेत्री व एकेकाळी सर्व रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी व आपल्या अभिनयाने डोळ्याचे पारणे फेडणारी अभिनेत्री सोनाची बेंद्रे पडद्याआड’, असं ट्विट त्यांनी केले होते.