सोनाली बेंद्रेने असा दिला भावनिक व प्रेरणादायी संदेश

0

नवी दिल्ली-अभिनेत्री सोनाली बेंद्रे कॅन्सरवरील उपचारासाठी सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे. हाय ग्रेड कॅन्सर असल्याची माहिती सोनाली बेंद्रे यांनी स्वत: ट्विटरच्या माध्यमातून दिली होती. त्याचप्रमाणे कॅन्सरशी झुंज देण्यास सज्ज असल्याचे ही तिने ट्विटरवरील पोस्टमध्ये लिहिले होते. कलाकार आणि चाहत्यांकडून तिला आधार मिळत आहे. नुकतंच सोनालीने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंसोबतच तिने भावनिक आणि तितकाच प्रेरणादायी मेसेजसुद्धा लिहिला आहे.

.

एक व्हिडिओसुद्धा सोनालीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती एका नवीन लूकमध्ये पाहायला मिळत आहे.

‘माझी आवडती लेखिका इसाबेल अलेंदेच्या शब्दांत आपल्यातील छुपी शक्ती दाखवण्यासाठी जोपर्यंत भाग पाडले जात नाही, तोपर्यंत आपण किती शक्तिवान आहोत हे कळतच नाही. दु:खद क्षणांमध्ये, युद्धाच्या काळात किंवा अत्यंत निकडीच्या वेळी लोकांकडून चमत्कारिक गोष्टी घडतात. माणसाची जगण्याची आणि काहीतरी नवीन करण्याची क्षमता अद्भुत आहे.

‘प्रत्येक दिवशी एक नवीन आव्हान आणि नवीन विजयाला मी सामोरी जात आहे. या प्रवासात माझा सकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवण्याचा मी प्रयत्न करत आहे. माझा प्रवास तुमच्यासोबत शेअर करणं हासुद्धा त्याचाच एक भाग आहे. आपण सर्व काही गमावलं नसून कुठेतरी, काहीतरी असं आहे जे तुमची साथ देत आहे, हेच मला जाणवत आहे.’ असे ती म्हणते.