न्यूयॉर्क-बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या कॅन्सरवर न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. आज फ्रेन्डशिप डेच्या निमित्ताने सोनालीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत, सर्व मित्रांचे आभार मानले आहेत. अतिशय भावूक करणारा आहे. परंतू सोनालीचा मॅसेज मात्र कमालीचा सकारात्मक आहे. या फोटोत सोनालीने डोक्याचे मुंडण केले आहे.
फोटोत सोनाली तिच्या दोन मैत्रिणींसोबत आहे. यातील एक हृतिक रोशनची एक्स-वाईफ सुजैन खान आहे. हा फोटो शेअर करत सोनालीने ‘ ही मी आहे आणि सध्या खूप आनंदी आहे. मी खूप नशिबवान आहे की, माझे मित्र त्यांच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून मला भेटायला येतात. मला कॉल करतात. मी एकटी नाही, याची जाणीव मला करून देतात. मला इतके प्रेम दिल्याबद्दल, आभाऱ़़ ,’ असे सोनाली म्हणाली. ‘आजकाल मला तयार व्हायला खूप कमी वेळ लागतो. कारण केसांचे काहीही करावे लागत नाही,’असेही तिने लिहिले आहे.