सोनभद्र हत्याकांड : पोलिसांचे निलंबन; मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत

0

सोनभद्र: उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे जमिनीच्या वादातून ९ जणांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संबंधित घटनेवरून संबंधित भागातील पोलिसांचे निलंबन करण्याचे आदेश दिले आहे. तसेच मृत कुटुंबियांच्या परिवाराला १८.५ लाखांची मदत जाहीर केली आहे. जखमींना प्रत्येकी अडीच लाखांची मदत केली जाणार आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत करण्याची घोषण मुख्यमंत्र्यांनी केली.