सोनभद्र हत्याकांड प्रकरणी २९ जणांना अटक

0

सोनभद्र: उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथील आदिवासी कुटुंबियांची जमिनीच्या वादातून हत्या करण्यात आली आहे. तब्बल ९ जणांची हत्या झाली आहे. संपूर्ण देशभरात या प्रकरणावरून उत्तर प्रदेश सरकारवर टीकेची झोड उठली आहे. दरम्यान या प्रकरणी आतापर्यंत २९ जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली. अटक करण्यात आलेल्यांकुडून बंदुखे हस्तगत करण्यात आली आहे. घटनेची चौकशी सुरु असून गुन्हेगारांना शिक्षा होईल असे आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

दरम्यान आज या घटनेतील पिडीत कुटुंबियांची काँग्रेसच्या उत्तर प्रदेशच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी भेट घेतली आहे.