साध्वी प्रज्ञासिंगला दिलासा; कोर्टात हजर राहण्यापासून सुटका

0

मुंबई: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी भाजपा खासदार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना प्रत्येक सुनावणीच्या वेळी कोर्टात हजर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले होते, मात्र सध्या संसदेचे अधिवेशन सुरु असून त्या कोर्टात हजर राहू शकत नसल्याने त्यांनी कोर्टात हजर राहण्यापासून सुटका मिळावी अशी मागणी केली होती. दरम्यान एनआयए कोर्टाने त्यांची मागणी मंजूर करण्यात आली असून अधिवेशन काळात त्यांना कोर्टात हजर राहण्यापासून सूट देण्यात आली आहे.