Special Train : आषाढी एकादशीसाठी भुसावळातून पंढरपूरसाठी विशेष गाडी सुटणार !

खासदार रक्षा खडसे यांची रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे मागणी

भुसावळ : आषाढी एकादशीनिमित्त वारकर्‍यांना पंढरपूरला जाणे सोयीचे होण्यासाठी भुसावळ रेल्वे स्थानकावर विशेष गाडी सोडण्यात यावे, अशी मागणी खासदार रक्षा खडसे यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीबाबत रेल्वे मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून याबाबत रेल्वे व्यवस्थापकांना निर्देश देण्यात आले असल्याची माहिती खासदारांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे. (Special train for Pandharpur from Bhusawal for Ashadi Ekadashi!)

2014 पासून सुटतेय विशेष गाडी
जळगाव जिल्ह्यातील हजारो वारकरी दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातात व जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने जाणार्‍या वारकर्‍यांची संख्या लक्षात घेता 2014 पासून आषाढी विशेष गाडी भुसावळातून सोडण्यात येत होती मात्र सलग दोन वर्ष कोरोना संकटामुळे निर्बंध आले होते मात्र कोरोना नियंत्रणात आल्याने भाविकांसाठी गाडी सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्षे वारकर्‍यांना पांडुरंगाचे दर्शन घेता आलेले नव्हते मात्र यंदा गाडी सुरू होणार असल्याने हजारो भाविकांना थेट पंढरपूर जाणे सोयीचे होणार असून लवकरच विशेष गाडीबाबत याबाबत रेल्वे प्रशासन माहिती देणार असल्याचा आशावाद खासदारांच्या संपर्क कार्यालयाने व्यक्त केला आहे.