शिंदखेडा येथे महसूल सप्ताह निमित्त सैनिकहो तुमच्यासाठी कार्यक्रमाला माजी सैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,,,
शिंदखेडा(प्रतिनिधी) :- राज्य शासनाच्यावतीने १ ऑगस्टपासून राज्यात महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताह अंतर्गत शून्य खडा तहसील कार्यालयात सैनिक हो तुमच्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात सैनिकांसाठी असलेल्या शासनाच्या योजना व सैनिकांच्या अडीअडचणी याविषयी चर्चा करण्यात आली.
महाराष्ट्र शासनातर्फे १ ते ७ ऑगस्ट,२०२३ या कालावधीत महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत युवा संवाद, एक हात मदतीचा, जनसंवाद, सैनिक हो तुमच्यासाठी, महसूल संवर्गातील कार्यरत आणि सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचा संवाद अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा,राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत सैनिकांना माहिती मिळावी आणि त्यांना योग्य लाभ घेता यावा या उद्देशाने सैनिक हो तुमच्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे होते. या कार्यक्रमात माजी सैनिक नामदेव आप्पा येळवे,अशोक कुराडे,भूषण पवार,नथू सूर्यवंशी,दिलीप राजपूत,संतोष माळी(पालक),आत्माराम मिस्तरी (पालक),मोतीराम पिंपळस्कर जिल्हा सैनिक कल्याण बोर्ड ऑर्डनरी सुभेदार मेजर हर्षु बहादुर्गे, वेडू माळी नायब तहसीलदार वाडिले , पोलीस निरीक्षक दीपक पाटील,अव्वलं कारकून विजय पाटील, भीमराव बाविस्कर, कविता पाटील उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार पवार तर आभारप्रदर्शन वेडू माळी यांनी केले
माजी सैनिकांच्या प्रमुख समस्या/मागण्या……..
१) जिल्हास्तरावर अर्ध सैनिक कल्याण बोर्ड उभारण्यात यावे,सैनिकांना शासनातर्फे देण्यात येणाऱ्या सुविधा अर्धसैनिकांनाही देण्यात याव्यात.
२) माजी सैनिकांचाही मतदारसंघ वेगळा करण्यात यावा.स्थानिक निवडणुकांमध्ये सैनिकांचा कोटा वेगळा असावा.
३) माजी सैनिकांना सफेद रेशन कार्ड ऐवजी केसरी रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यात यावे.
४) ग्रामपंचायत, नगरपंचायत, महापालिका या ठिकाणी प्रत्येक वर्षी 26 जानेवारी व 15 ऑगस्ट या दिवशी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात यावे.
५) सैनिकांच्या नावे असलेल्या शेतापर्यंत वहीवाट असावी
६) तहसील कार्यालयाच्या आवारात असलेल्या विजय स्मारकाचे पुनर्जीवन करण्यात यावे
७) माजी सैनिकांसाठी व अर्ध सैनिकांसाठी बाळासाहेब ठाकरे सैनिक सन्मान योजना लागू करण्यात यावी
माजी सैनिकांच्या विविध मागण्या शासनापर्यंत पाठवण्यात येतील.तहसील कार्यालयामार्फत राबवण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार योजना,श्रावण बाळ राजकीय सेवानिवृत्ती योजना विविध योजनांचा लाभ माजी सैनिकांना देण्यात येईल. शासनाच्या विविध योजनांचा लाभ अर्धसैनिकांनाही देण्यात येईल
ज्ञानेश्वर सपकाळे, तहसीलदार शिंदखेडा