उद्योजकता मार्गदर्शनला उत्स्फूर्त प्रतिसाद, ६०० भावी उद्योजकांनी घेतले मार्गदर्शन….

जळगाव | श्रमाची लाज बाळगता उद्योग व्यवसाय करावा, त्यासाठी प्रचंड इच्छा शक्ती जोपासली पाहिजे तरच उद्योगाला गती मिळते आणि आपण यशस्वी होतो, मी स्वतः डॉक्टर असताना ही शेतकरी आहे असे अभिमानाने सांगतो. स्वावलंबी भारत सहाय्य करण्यासाठीच आहे असे मार्गदर्शन डॉ. अतुल सरोदे यांनी लोणारी समाज मंगल कार्यलयात तेजोदीप नवविचार फाउंडेशन व स्वावलंबी भारत यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित भव्य उद्योग व्यवसाय करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात केले. ६०० भावी उद्योजकांनी कार्यक्रमाला उपस्थिती दिली. यावेळी मंचावर डॉ.अतुल सरोदे, जयंतीलाल सुराणा, डॉ.युवराज परदेशी, संतोष मराठे, श्रीकांत झाबरे, प्रज्ञा साळवे, गिरीश कुळकर्णी, सुनीता मोडक, राजेश नेहते उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते ह.भ. प.वै. तोताराम महाराज, ह.भ. प.वै. झेंडूजी महाराज बेळीकर, ह.भ. प.वै.जगन्नाथ महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून व द्वीपप्रजलनाने झाली. फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश नेहते यांनी प्रास्ताविक केले. फाउंडेशनच्या संकेतस्थळाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सुत्रसंचालन सुनील नेहेते, लीना लोखंडे, धर्मराज देवकर यांनी केले तर आभार ज्ञानदेव पाचपांडे यांनी मानले. यशस्वीते फाउंडेशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. मान्यवरांनी अनेक विषयांवर प्रकाश टाकत भावी उद्योजकांना मार्गदर्शन केले.
सुनीता मोडक यांनी महिला स्वयंरोजगार यावर मार्गदर्शन केले श्रीकांत झांबरे यांनी कृषी, सरकारच्या योजना यावर मार्गदर्शन केले. यावेळी शेती बद्दल प्रश्न उत्तरे ही झाली. डॉ. युवराज परदेशी यांनी स्टार्टअप इंडियावर मार्गदर्शन करतांना तुमचा व्यवसाय तुमची विशेषता समोर आणा हे स्टार्टअप आहे असे सांगितले. केळीचा व्यवसाय करताना त्याच्या विविध प्रॉडक्ट्सचा विचार करून व्यवसाय सुरू करता येतो ते स्टार्टअप होईल. प्रज्ञा साळवे यांनी सूक्ष्म अन्न प्रक्रिया यावर मार्गदर्शन करतांना उद्योग व व्यवसाय याबद्दल माहिती दिली. या उद्योगासाठी 35 टक्के पर्यंत अनुदान मिळू शकते.
संतोष मराठे यांनी स्वावलंबी भारत अभियानावर माहिती देतांना नोकरीच्या मागे न लागता नोकरी निर्माण करणारे व्हा, हजारो योजना सरकारी अनुदानाशी संबंधीत आहेत. सबसिडी मिळणाऱ्या योजनांची माहिती घेऊन व्यवसाय सुरू केले पाहिजे असे सांगितले. यावेळी जयंती सुराणा यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
विविध क्षेत्रातील विशेष कार्य तसेच यश प्राप्त करणाऱ्या नागरिकांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. भावेश जंगले, स्वाती पाचपांडे, रचना पाटील, प्रतिभा जावळे, निलेश बाकसे, दिलीप पाटील, ललित इंगळे, भरत पाटील, ह.भ.प.पंढरीनाथ पाटील, ह.भ.प.संजय चौधरी, विलास वराडे, धर्मराज देवकर, निखिल लोखंडे, किरण पाटील, राजेंद्र राणे व डॉ.राहुल सूर्यवंशी यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रम स्थळी माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, समाजसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नितिन धांडे, सामाजिक कार्यकर्ते सतीश सपकाळे, शिवसेना तालुका प्रमुख संतोष सोनवणे, महालक्ष्मी ग्रुपचे अध्यक्ष अनिकेत पाटील, रेल कामगार सेनेचे ललित मुथा, शिवसेना शहरप्रमुख हेमंत खंबायत, रमाशंकर दुबे, विशाल ठोके आदी मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली.