श्रीदेवीला मरणोत्तर मिळालेला पुरस्कार स्वीकारला मुलगी जान्हवीने

0

मुंबई : ‘मॉम’ चित्रपटासाठी श्रीदेवीला मरणोत्तर उत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार दिला गेला. पुरस्कार घेण्यासाठी मुलगी जान्हवी कपूर तिची साडी घालून दिल्लीतील विज्ञान भवनात पोहोचली. तिच्यासोबत लहान बहीण खुशी कपूर आणि वडील बोनी कपूरदेखील होते. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार स्वीकारण्यावरून वाद निर्माण झाला होता. अखेर सुरळीत पुरस्कार वितरण पार पडले. माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्याच हस्ते पुरस्कारांचं वितरण करण्यात आले. पुरस्कार घ्यायला जाणार नाही, असं म्हणणाऱ्या सगळ्या कलाकारांनी पुरस्कार स्वीकारले.