रायपुर: केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आज छत्तीसगढ़ दौऱ्यावर आहे. बीएसएफच्या विशेष विमानाने ते जगदलपुर येथे पोहोचले. जगदलपुर येथून हेलिकॉप्टरने दंतेवाड़ा येथे जातील. दंतेवाडा येथे मुख्यमंत्री डॉ.रमन सिंह यांच्या सोबत दंतेश्वरी मंदिरात दर्शन केल्यानंतर ते जाहीर सभा घेणार आहे. दरम्यान येथून ते विकास यात्रेस हिरवी झेंडी दाखविणार आहे. विकास यात्रा २०१८ ला आजपासून सुरुवात होत आहे. छत्तीसगड पासून याची सुरुवात होत आहे.