जनहितार्थ उपक्रमांनी वाढदिवस होणार साजरा
जळगाव प्रतिनिधी । शिवसैनिकांनी अभेद्य एकजुट दाखवून उन्मेष पाटील यांच्या विजयात हातभार लावल्याचे नमूद करत आपला वाढदिवस हा लोकोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील केले. ते आज शिवसेनेच्या बैठकीत बोलत होते.ना. गुलाबराव पाटील यांचा वाढदिवस ५ जून रोजी आहे. या अनुषंगाने आज पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीचे आयोजन सुगोकी लॉन पाळधी येथे करण्यात आले होते.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ हे होते. यात बोलतांना ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत समस्त शिवसैनिकांची अभेद्य एकजुट दाखवून काम केले. याचमुळे जळगाव लोकसभा मतदारसंघात खासदार उन्मेष पाटील यांना विक्रमी मताधिक्य मिळाले. ही एकजुट भंग व्हावी म्हणून विरोधकांचे प्रयत्न असले तरी याला बळी पडू नका असे आवाहन त्यांनी केले. ते पुढे म्हणाले की, शिवसेनेचा कार्यकर्ता हा बाळासाहेबांच्या विचारांना व तत्त्वांना मानणारा असून प्रत्येक शिवसैनिकांनी आपल्यातील एकजुटीत फूट पडणार्यां पासून सावध राहावे. या वर्षीही पाळधी येथे ५ जूनला संध्याकाळी ६.०० वाजता जाहीर सभेचेही आयोजन करण्यात आलेले आहे.
पाळधीची सभा ऐतिहासिक होणार
यावेळी अध्यक्षीय भाषणात जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांनी सांगितले की, ना. गुलाबराव पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद बढतीसाठी एक लाखांच्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच नियोजन करून कामाला लागावे. तसेच दुष्काळी परिस्थितीतिचे भान ठेवून कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या ध्येयानुसार नाविन्यपूर्ण उपक्रमांनी गुलाबभाऊंचा वाढदिवस साजरा करावा असे नम्र आवाहन करून पाळधीची सभा ऐतिहासिक होणार असल्याचे सांगितले.
एस टी महामंडळाच्या चालकाचा सत्कार
एस.टीच्या ७१ व्या वर्धापनदिना निमित्त पाळधी येथिल चालक महेश गोकुळ फुलपगार यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच मुकुंद नन्नवरे,मोतीअप्पा पाटील, शेख काळू ,गोकुळ ननावरे,किशोर कोळी, शंकरराव सावंत, युवराज कोळी,पुंडलिक डावरे, डॉ रमाकांत कदम,एन. एस. पाटील व पिंटू पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
व्यासपीठावर जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा संघटक जळकेकर महाराज, उपजिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, पी.एम. पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील,धरणगाव तालुका प्रमुख गजानन पाटील, जळगाव तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, माजी उपसभापती प्रेमराज पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, पवन सोनवणे, पं. स.सदस्य नंदलाल पाटील, समाधान चिंचोरे, जळगाव कृ ऊ बा सभापती कैलास चौधरी, ,पं. स.सदस्य जनाआप्पा पाटील,चर्मकार महासंघाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे, डी. ओ. पाटील, डॉ कमलाकर पाटील, प्रमोद पाटील, सचिन पवार,रमेश पाटील,गोकुळ लंके,दिनकर पाटील,श्याम कोगटा यांच्यासह लोकप्रतिनिधी व पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
सामाजिक उपक्रम
दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता ना.गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्याने वृक्षारोपण व संवर्धना साठी वृक्ष लागवड, आमदार निधीतून म्हसावद व पाळधी येथ अद्ययावत रुग्ण वाहिका तसेच धरणगाव येथे स्वर्गरथ देणार आहे. बियाण्याची तुला, वृक्षरोपांची तुला, जिल्हा परिषद शाळांमध्ये वह्या वाटप, ३ जूनला भीमगीतांचा कार्यक्रम, श्रीमद भागवत सप्ताह तसेच विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी शाल व बुके न आणता विद्यार्थ्यांना वह्या, शैक्षणिक साहित्य किंवा रोप आणावे असे आवाहन करण्यात आले.