देशाच्या इतिहासात आजचा दिवस महत्त्वाचा-मोदी

0

गांधीनगर-देशातील प्रत्येक नागरिकांसाठी आजचा दिवस महत्वाचा असून देशातील एका विराट व्यक्तिमत्वाचे आज सर्वत्र नाव झाले आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विशाल प्रतिमेचे समर्पण करण्याची संधी मला मिळाली आहे. मी स्वत:ला नशीबवान समजतो असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ यूनिटीच्या लोकार्पण सोहळ्यावेळी केले.

गुजरातच्या जनेतेने दिलेले सन्मानपत्र माझ्यासाठी महत्वाचे असून या मातीत मी लहानाचा मोठा झालो, इथे माझ्यावर संस्कार घडले. ज्याप्रमाणे आई आपल्या मुलाच्या पाठीवर थाप टाकते त्याप्रमाणे हे सन्मानपत्र माझ्यासाठी आहे, असे मी मानतो. त्यामुळे मला अधिक प्रेरणा मिळत आहे. त्यामुळे गुजरातच्या जनेतेचे मी आभार मानतो असे यावेळी मोदींनी सांगितले.