नवी दिल्ली: जगभरात कोरोनाच्या दुसरी लाटेची संकट आहे. भारतातही दुसरी लाट येण्याचे संकेत आहे. यावरच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाष्य केले आहे. भारतातील रुग्णसंख्या कमी होत असली तरी धोका अजूनही टळलेला नाही. गाफील राहू नका, खबरदारी घ्या असा सल्ला मोदींनी दिला आहे. उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथील पाणीपुरवठा योजनेचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ई-शुभारंभ मोदींच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. लस निर्मितीवर युद्ध पातळीवर काम सुरु आहे, मात्र त्यात अजून यश आलेले नाही. लस येईल तोपर्यंत काळजी घ्या, गाफील राहू नका असा सल्ला मोदींनी दिला आहे.
भारतात मागील २४ तासांत ४६ हजार २३२ रुग्ण आढळले. तर ५६४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयातर्फे आली आहे.
देशातील करोनाबाधितांची संख्या शनिवारी ९० लाख ५० हजार ५९७ इतकी जाहली आहे. कोरोनातून ८४ लाख ७८ हजार रुग्ण बरे झाले आहेत. बरे होण्याचे प्रमाण ९३.६७ टक्क्यांवर पोहोचले आहे. देशात सध्या चार लाख ३९ हजार ७४७ उपचाराधीन रुग्ण असून ही संख्या एकूण रुग्णसंख्येच्या ४.८६ टक्के इतकी आहे. मृतांची एकूण संख्या एक लाख ३२ हजार ७२६ वर पोहोचली आहे.