शेअरमार्केट कमजोरस्थितीत ; सेंसेक्स खाली

0

नवी दिल्ली- शेअर बाजारात शुक्रवारी कमजोरी पाहायला मिळत आहे. कच्च्या तेलाचा पुरवठा आणि व्यापार युद्धामुळे जगभरातील बाजारपेठांमध्ये मंदीचे वातावरण आहे. त्याचा परिणाम शेअर मार्केटवर होत आहे. आज कामकाज सुरु होताच सेंसेक्स ७३ अंक खाली येऊन ३५ हजार ३५९ अंकावर आले आहे. त्याचबरोबर निफ्टी २९ अंकांनी खाली येऊन १० हजार ७१२ अंकावर पोहोचले आहे. बँक तसेच फार्मा क्षेत्रातील शेअरमध्ये अधिक खाली गेले आहे.

कामकाज सुरु झाल्यानंतर महिंद्रा एंड महिंद्रा, एचसीएल टेक, बीपीसीएल, आईओसी आणि आईटीसीच्या शेअरमध्ये २.६६ टक्के तेजी पाहायला मिळाली. तर बीएसई वकरांगी, जेट एयरवेज, जुबिलेंट फूड अंनि रेन इंडस्ट्रीजमध्ये ५ टक्के तेजी आहे. तर निफ्टीवर यूपीएल, डॉ.रेड्डीज, ल्यूपिन, आरआईएल आणि ग्रेसिमचे शेअर १.७९ टक्के खाली गेले आहे. सोबतच बीएसईवर क्वालिटी, ग्रुनेअल्स इंडिया, पीसी ज्वेलर्स, एचसीसी आणि अजंता फार्माच्या शेअर ५ टक्क्याने खाली आले आहे.

पैसा मजबूत
शुक्रवारी रुपया मजबूत स्थितीत सुरु झाला. डॉलरच्या तुलनेत रुपया १७ पैशांनी मजबूत झाला. डॉलरच्या तुलनेत रुपया ६७.८१ असे आहे.