पाचोरा: मुंबईमध्ये सुरूअसलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक पूर्णत: कोलमडले असून, मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही लांबपल्याच्या गाड्या ज्या ठिकाणी असतील त्याच ठिकाणी उभे करण्यात आले आहे. आज पाचोरा रेल्वे स्थानकात ०१०२४ गोरखपूर, लोकमान्य टिळक जाणारी गाडी सकाळी ४ वाजेपासून थांबवण्यात आली होती. यामुळे प्रवासी संतप्त होवून रुळावर उतरत प्रशासन विरोधात घोषणा देत आपला संताप व्यक्त केला.
गोरखपूर येथून १ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास निघालेली गोरखपूर -लोकमान्य टिळक विशेष उन्हाळी गाडी ही पहाटे ४ वाजेच्या सुमारास पाचोरा रेल्वे स्थानकात थांबवण्यात आली. सकाळी ९ वाजले तरी गाडी पुढे रवाना होत नसल्याने प्रवाशी आक्रमक झाले त्यातच संपूर्ण वातानुकूलित गाडीचे ए.सी.बंद करून ठेवण्यात आल्याने प्रवाशी हैराण झाले होते. त्यातच ही गाडी येथेच रद्द करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून जाहीर झाल्याने प्रवाशांनी रेल्वे रुळावर उतरून रेल्वे प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत रेल रोको आंदोलनास सुरुवात केली.
पाचोरा रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पाचोरा शिवसेनेकडून प्रवाशांना फळ चहा बिस्किट वाटप व मेडीकल सेवा पुरवण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष संजय गोहील,उद्योगपती मुकंद आण्णा बिल्दीकर, उपनगराध्यक्ष शरद पाटे, शिवसेना शहरप्रमुख किशोर आप्पा बारावकर, युवासेना शहरप्रमुख संदीपरांजे पाटील, दादा भाऊ चौधरी, सतिष आबा चेडे, रेहमान तडवी,आनंद पगारे, गंगाराम पाटील, जितेंद्र पाटील, जितेंद्र पेंढारकर,वैभव राजपूत, चेतन सपकाळे, आण्णा चौधरी, विजय भोई, अजय पाटील,व शिवसैनिक उपस्थित होते प्रवाशांनी आभार मानून कौतुक केले