झिरो लोडशेंडीग त्वरित बंद करा चोपडा तालुका शेतकरी संघटनेची मागणी

भुसावळ प्रतिनिधी दि 2

..पाऊस नाही पिके कोमजलेली आहेत दिवसा 35°c तापमान व रात्री पिकांना पाणी द्यायचं म्हटलं तर झिरो लोडशेडींगच्या नावाने लाईट बंद महावितरण च्या भोंगळ कारभारामुळे शेतकरी देशोधडीला लागत आहे अशी खंत शेतकरी संघटनेचे नेते संदीप पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शेतकरी आपल्या पिकांना वाचवून

संसाराच्या गाडा पुढे भेटण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे पावस्

हुलकावणी दिल्यावर माना टाकणाऱ्या पिकांना पाणी देण्यासाठी रात्री-अपरात्री शेतात पहारा देऊन पाणी देण्याचे काम करत असताना महावितरणने झिरो लोडशेंडीग च्या नावाने रात्र रात्र लाईट बंद राहत आहे त्यामुळे शेतकरी हवा दिल दिसून येत आहे त्यातच शेती शिवारांमध्ये बिबट्याच्या मुक्त संचार संचाराच्या दहशतीखाली शेतकरी आपला जीव मुठीत धरून शेतात पाणी देण्याचं काम करत आहे महावितरणने शेतकऱ्यांच्या जीवाशी न खेळता पुरेपूर प्रमाणात वीज देऊन शेतकऱ्यांना सहकार्य करावे अन्यथा शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असे निवेदन महावितरण चे उप अभियंता विनोद पाटील चोपडा यांना देण्यात आले आहे यावेळी शेतकरी संघटनेचे नेते संदीप पाटील, किरण गुजर, सचिन शिंपी, विनोद धनगर, रवींद्र माळी, प्रेमचंद धनगर, कविता पाटील, जयश्री देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असताना नेहमी म्हणायचे आम्ही सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना दिवसा लाईट देऊ त्यांना सत्तेत येऊन दीड वर्ष उलटलं मात्र शेतकऱ्यांना दिवसा लाईट तर मिळाली नाही मात्र रात्रीची लाईट पण पूर्ण मिळत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शब्दाला जागावे व शेतकऱ्यांना दिवसाला लाईट द्यावी संदीप आधार पाटील, अध्यक्ष शेतकरी संघटना…..