पेटीएम मॉलची आसुस इंडियासह धोरणात्मक भागीदारी

0

मुंबई- पेटीएम ईकॉमर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीतील पेटीएम मॉलने रिटेल स्टोर्ससाठी आपले पीओएस समाधान सादर केले ज्यामुळे दुकानदार त्यांच्या ऑफलाइन आणि ऑनलाइन ग्राहकांचे व्यवस्थापन करू शकतील. आसुस रिटेल स्टोर्समध्ये हे पीओएस समाधान लागू करण्यासाठी कंपनीने आसुस इंडियासोबत धोरणात्मक भागीदारी केली आहे आणि त्या पाठोपाठ ही सुविधा इतर ब्रँड्स आणि रिटेल स्टोर्ससाठी देखील विस्तारित करणार आहे.

कंपनीने आपल्या मंचावरून व्हीवोबुक एक्स५०७ चे ऑनलाइन लॉन्च देखील केले व ते आसुस ऑफलाइन रिटेल स्टोर्समधून उपलब्ध देखील केले आहे. त्याशिवाय, पेटीएम मॉल आसुस ऑफलाइन स्टोर्सना आपल्या नावीन्यपूर्ण “डिजिटल एक्स्पीरियन्स झोन”ने आणि पेटीएम मॉल क्यूआरने सक्षम करणार आहे, ज्यामुळे ग्राहकांना दुकानातूनच आसुस उत्पादने ऑर्डर करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.

पेटीएम मॉलचे सीओओ अमित सिन्हा म्हणाले, “पेटीएम मॉलवर आणि आसुसच्या भागीदार ऑफलाइन स्टोर्समार्फत आसुस व्हीवोबुक एक्स५०७ श्रेणीच्या एक्स्क्लुझिव लॉन्चसाठी आसुसशी भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे.आपल्या देशातील सुमारे ८०%ऑफलाइन रिटेल स्टोर्सकडे त्यांच्या इन्व्हेंटरीचे व्यवस्थापन करणारे आवश्यक असे तंत्रज्ञान नाही व ते ऑनलाइन कॉमर्स क्रांतीत सहभागी होण्यासाठी सुसज्ज नाहीत.

आमचे ओ२ओ मॉडेल ऑफलाइन दुकानदारांच्या गरजेनुसार आहे व त्यामुळे आम्ही हे समग्र सोल्युशन, पेटीएम मॉल पीओएस सादर करत आहोत. ते आता दुकानात येणा-या ग्राहकांना सोयिस्कररित्या सेवा देऊ शकतात तसेच या पीओएस यंत्रणेच्या मदतीने स्थानिक स्तरावर ऑनलाइन ऑर्डर्स पूर्ण करू शकतात.पहिल्या टप्प्यात आम्ही आसुस ब्रॅंडच्या ऑफलाइन स्टोर्सना सक्षम करत असून लवकरच त्याचा आणखीन विस्तार करणार आहोत.

साऊथ एशिया आणि भारत, आसुस इंडियाचे प्रादेशिक प्रमुख लिऑन वाययू म्हणाले, “पेटीएम मॉलशी भागीदारी करून व्हीवोबुक एक्स५०७ लॉन्च करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.त्याचा अद्भुत लुक आणि वैशिष्ट्ये बाजारातील किफायतशीर अशा इतर सर्व लॅपटॉपच्या श्रेणीत उठून दिसतील अशी आम्हाला खात्री आहे. त्या व्यतिरिक्त पेटीएममॉलच्या सहयोगाने, ग्राहकांचा खरेदीचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी आणि संचालनाची क्षमता लक्षणीयरित्या सुधारण्यासाठी ग्राहक केन्द्रित नावीन्यपूर्ण गोष्टी लागू करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. या भागीदारीमुळे आम्ही आमच्या भागीदारांना सक्षम बनवू शकू आणि त्यांना डिजिटल नेटवर्कची विस्तृत श्रेणी पुरवू शकू, ज्याच्यामुळे आमच्या ग्राहकांना खरेदीचा अधिक दर्जेदार अनुभव घेता येईल.