भारताच्या परकीय चलनात दमदार वाढ! रिझर्व्ह बँकेने दिली माहिती

मुंबई : भारताच्या परकीय चलन गंगाजळीत यंदा मोठी वाढ झाली असून, २८ एप्रिल रोजी संपलेल्या आठवड्याच्या अवधीत गंगाजळी ४.५३ अब्ज डॉलरने वाढून ५८८.७८ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे, रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून ही माहीती पुढे आली आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार २४ मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलनाच्या साठ्यात ५.९८ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. यासह आता परकीय चलनाचा साठा ५७८.७८ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. यापूर्वी १७ मार्च २०२३ रोजी संपलेल्या आठवड्यात त्याच्या परकीय चलनाच्या साठ्यात १२.७८९ अब्ज डॉलरची वाढ झाली होती.