पालिका कर्मचाऱ्याला लाच घेतांना अटक

0

मुंबई – पालिकेच्या कर्मचाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. अशोक आनंदा रोकडे (वय ४२) असे त्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.  मुंबई महानगर पालिकेच्या एफ पश्चिम वॉर्डातील लेबर पदावर काम करणाऱ्या अशोक रोकडे आणि त्याच्या वतीने लाचेची रक्कम स्वीकारणाऱ्या सज्जाद जब्बार खान या दोघांना लाचलुचपत विभागाच्या मुंबई युनिटने अटक केली. या प्रकरणातील ५२ वर्षीय तक्रारदाराच्या तक्रारीनुसार एसीबी ने सापळा रचून ही कारवाई केली आहे.

महात्मा गांधी पथ क्रांती योजनेनुसार मिळणाऱ्या घरांमध्ये पात्र असलेल्या एका व्यक्तीला घर मिळाल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी एफ पश्चिम मधील कामगार अशोक रोकडे याने या पूर्वी ३ लाख रुपये पीडित व्यक्तीकडून स्वीकारले होते. मात्र यानंतरही ५० हजारांची मागणी केली जात होती. त्यामुळे पीडित व्यक्तीने तक्रार केली होती. त्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.