‘स्टुडंट ऑफ द इयर २’मधील धमाकेदार गाणं प्रदर्शित !

0

मुंबई : ‘स्टुडंट ऑफ द इयर’ च्या यशानंतर दिग्दर्शक करण जोहरचा ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ चाहत्यांच्या भेटीला येतो आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता. दरम्यान आता चित्रपटातील ‘जवानी दिवानी’ हा गाणं प्रदर्शित करण्यात आले आहे. चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर समोर आल्यानंतर चित्रपटातील गाणं चाहत्यांच्या भेटीला आले आहे. चित्रपटात अभिनेता टायगर श्रॉफसोबत अभिनेत्री अनन्या पांडे, तारा सुतारिया पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. मोठ्या पडद्यावर हे त्रिकूट पहिल्यांदाच भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘जवानी दिवानी’ गाण्यामध्ये टायगर, अनन्या आणि तारा यांचा दमदार डान्स परफॉर्मन्स पाहायला मिळतो आहे.

‘स्टुडंट ऑफ द इयर’ चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री आलिया भट्ट, अभिनेता वरूण धवण, सिद्धार्थ मल्होत्रा यांनी बॉलिवूडमध्ये डेब्यू केले होते. १९७२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जवानी-दीवानी’ या गण्याचा रिमेक ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ चित्रपटात साकारण्यात येणार आहे. आता हा चित्रपट चाहत्यांचे किती मनोरंजन करेल हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.