चिपळूण : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) नुकत्याच जाहीर झालेल्या जेईई मेन २०१८ परीक्षेच्या निकालात चिपळूणातील ‘ओरायन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’च्या तीन विद्यार्थ्यांनी जे.ई.ई.मेन्स, चार विद्यार्थ्यांनी व्ही.आय.टी.ई.ई.ई. तर सहा विद्यार्थी तामिळनाडू येथील विश्वप्रसिद्ध ‘एसआरएम’ विद्यापीठातील अभ्यासक्रमासाठी निवडले गेले आहेत.
जेईई मेन्स परीक्षेत इन्स्टिट्यूटच्या संकेत जाधव, आर्यन भुरण, पूनम गारजले या विद्यार्थ्यांनी यश मिळविले असून त्यांची पुढील ‘जेईई ऍडव्हान्स’ची परीक्षा २० मे २०१८ रोजी होणार आहे.
‘वेल्लोरे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या वेल्लोरे, चेन्नई कॅम्पससाठी इन्स्टिट्यूटच्या चिपळूण बॅचमधील श्रेयस भावे, असदअली कपाडी, सौमिल्य गावकर, सोहम उतेकर यांची अभिनंदनीय निवड झाली आहे. तर तामिळनाडू येथील विश्वप्रसिद्ध ‘एसआरएम’ विद्यापीठासाठी तन्वी इळके, साध्वी शिंदे, भूमिका चौधरी, कोमल सुर्वे, ऋतुजा जगताप, ऋतुजा कदम यांची निवड झाली आहे.
देशभरातील एनआयटी, आयआयटी आणि इतर सरकारी मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये बीटेक, बीईच्या अभ्यासक्रम प्रवेशासाठी जेईई मेन परीक्षा घेतली जाते. देशातील अनेक खासगी संस्था देखील जेईई मेन निकालाचा आधार घेत प्रवेश देत असतात.गतवर्षी दहा विद्यार्थ्यांच्या माध्यमातून संस्थेने यश मिळविले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे चिपळूणच्या परशुराम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. विनय नातू, गद्रे ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य शेंड्ये, ओरायन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स चिपळूणचे डायरेक्तर प्रसन्न राठोड यांनी अभिनंदन केले आहे.