भुसावळ येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना एकक व शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ स्पोर्टिंग फिटनेस’ या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त Fit India Pledge ‘ फिट इंडिया ‘ शपथ घेण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजू फालक होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ एस व्हीं बाविस्कर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. आर बी ढाके यांनी केले.
*प्राचार्य डॉ राजू फालक* – sound mind in a sound body, निरोगी मन निरोगी शरीरात वास करते, उत्तम आरोग्यासाठी विद्यार्थांनी दररोज किमान एक तास व्यायाम करावा, चालणे, जॉगिंग करणे, जीम मध्ये जाणे, कोणत्यातरी एका आवडीच्या खेळात सहभाग घेणे, सुर्यनमस्कार घालणे, दररोज सकाळी उठून किमान ३० मिनिटे धावणे, सकाळी किंवा सायंकाळी वेळ काढून सायकल चालवणे इ . व्यायाम आपल्या उत्तम निरोगी शरीरासाठी व आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी विनाखर्चीक औषधी आहे असे आपल्या प्रास्ताविकात सांगितले आणि उपस्थितांना मैं प्रतिज्ञा करता हूँ की , एक सक्रिय और स्वस्थ जीवन शैली जीऊँगा. अपने फिटनेस और स्वास्थ के लिए हर दिन ३० मिनट का समय निकालुंगा. अपने पारिवार के सदस्यों, दोस्तों और पडोसियों को फिट और स्वस्थ रहने के लिए प्रोत्साहित करूँगा. फिट इंडिया मोबाईल ऐप पर नियमित रूप से फिटनेस मूल्यांकन करुंगा. ही फिट इंडिया शपथ दिली.
प्रा डॉ जयश्री सरोदे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा. डॉ. संजय चौधरी, रासेयो सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. जे बी चव्हाण, प्रा आर डी भोळे विद्यार्थी विकास अधिकारी, प्रा डॉ जी पी वाघुलदे, क्रिडा समिती सदस्य प्रा. डॉ अनिल सावळे प्रा एस डी चौधरी प्रा डॉ जयश्री सरोदे प्रा श्रेया चौधरी प्रा प्रकाश सावळे यांनी परिश्रम घेतले