मल्ल्या यांच्या वक्तव्यानंतर भाजपच्याच सुब्रमण्यम स्वामींचे जेटलींवर आरोप

0

नवी दिल्ली-देश सोडण्याआधी मी अर्थमंत्री अरुण जेटलींना भेटलो होतो असा खळबळजनक दावा कर्जबुडव्या विजय मल्ल्या याने केल्यानंतर आता भाजपाचेच ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. स्वामींनी ट्विटरद्वारे जेटलींवर आरोप केले आहे.

मल्ल्या फरार होण्यासंबंधी दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे 24 ऑक्टोबर 2015 रोजी मल्ल्याविरोधातील लूक आउट नोटीस कमकुवत करण्यात आली, जेणेकरुन 54 लगेज बॅग घेऊन मल्ल्याला देशाबाहेर पळता यावे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संसदेमध्ये मल्ल्याने अर्थमंत्री जेटली यांना लंडनला रवाना होत असल्याची माहिती दिली होती. असं स्वामींनी ट्विट करुन म्हटले आहे.