यश हे फक्त कठोर परिश्रमाचे फळ आहे. महेंद्र पाटील,आगार प्रमुख 

चोपडा (प्रतिनिधी)

महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी पाटील महाविद्यालयाच्या कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यासाठी स्वागत समारंभ दिनांक 01 व 02 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी ए सुर्यवंशी होते तर उद्‌घाटक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभाग चोपडा चे आगार प्रमुख श्री महेंद्र पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून विचारपिठावर कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. एस पी पाटील, महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. डॉ. शैलेशकुमार वाघ, ज्येष्ठ प्राध्यापक दिपक सोमाणी, प्रा. माया शिंदे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री ए. एन बोरसे, व समन्वयक श्री पी एस पाडवी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी . महेंद्र पाटील यांनी यशाचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे कठीण मेहनत आई वडिलांच्या कष्टाचे साफल्य होण्यासाठी मेहनतीचा सल्ला दिला व वेळ व शिक्षण यांची योग्य तळजोड करुन यशस्वी व्हा अशा शुभेच्छा दिल्या.अध्यक्षीय भाषणात प्राचार्य सुर्यवंशी सरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करीत भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाप्रसंगी इयत्ता 11वी व 12वी च्या विद्यार्थांनी आपल्या सुप्त कला गुणांना उजाळत विविध कलाविष्कार सादर केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पहिल्या दिवशी दिपाली पाटील व पुष्पा दाभाडे यांनी तर दुसऱ्या दिवशी इयत्ता 12 वी वाणिज्य च्या विद्यार्थीनींनी केले तर आभार संदीप देवरे यांनी मांडले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर बंधू भगिनी यांचे अनमोल योगदान लाभले.