सातारा-माथेरानमध्ये सेल्फीच्या नादात एक महिला पर्यटकांने जीव गमावलाय आहे. सेल्फी काढण्याच्या नादात एका ३५ वर्षीय महिलेचा येथे दरीत कोसळून मृत्यू झाला. सरिता चौहान अससे मृत महिलेचे नाव आहे.
सरिता चौहान या नवी दिल्लीच्या रहिवासी होत्या. चौहान परिवार दक्षिण जुनी दिल्ली येथून खास माथेरान फिरावयास आले होते. एक मुलगी आणि मुलगा व मेहुणी आणि सरिता व त्यांचे पती असा ५ जणांचा परिवार दिल्लीतून खास माथेरानला आले होते. माथेरानच्या लुईस पॉइंट येथे आपले पती राममहेश यांच्यासोबत फिरायला गेल्या होत्या. लुईस पॉइंट इथल्या ५०० फूट दरीजवळ असलेला कठडा ओलांडून सरिता आपल्या पतीसोबत सेल्फी काढण्यासाठी गेल्या. पावसाळी वातावरण असल्याने कड्या किनारी वारे वाहत असतात. याचवेळी सोसाट्याचा वारा आला आणि त्यामुळे सरिता यांचा तोल गेला आणि त्या ५०० फूट दरीत कोसळल्या. याबाबत माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी शोधकार्य सुरू झाले आहे.