जळगाव: पाकिस्तानातुन साखर मागवुन हे भाजप सरकार भारतातील शेतकरीवर्गाला संपवण्याचा घाट घालत आहे. याचा निषेध म्हणून जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसतर्फे साखर वाटप करून निषेध करण्यात आला. यावेळी रस्ताने येणाऱ्या-जाणाऱ्या वाहन धारकांना साखर वाटण्यात आली. तसेच साखर का वाटतो आहे याचे कारण सांगण्यात आले. पाकिस्तानातून साखर आयात करण्यात आली आहे. यावरून भाजपवर टीका होत आहे. एकीकडे भारत पाकिस्तानचे संबंत तणावाचे असतांना सरकारचे हे कृत्य राष्ट्रविरोधी असल्याचे बोलले जात आहे.