श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये आज सकाळी चकमक सुरू झाली आहे. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. मात्र सुरक्षादलाच्या या कारवाईनंतर संतप्त स्थानिकांनी सुरक्षादल आणि माध्यम प्रतिनिधींवर दगडफेक केली आहे. दगडफेक करणाऱ्यांमध्ये महिलांचा आणि तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता.