नवी दिल्ली-सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी आज पटियाला न्यायालयात सुनावणी झाली. आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याचा हा प्रकार असल्याचे सुनंदा पुष्कर यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. सुनंदा यांचा मृत्यू विष प्रयोगामुळे झाल्याचा दावा सरकारी वकिलाने न्यायालयात केला आहे. सुनंदा यांनी सोशल मीडियावर केलेले वक्तव्य त्यांच्या मृत्यूच्या घोषणेच्या रूपात मानले जाऊ शकते, असेही त्यांनी म्हटले. सुनावणी दरम्यान दिल्ली पोलिसांनी आरोपपत्राच्या आधारे न्यायालयाला सांगितले की, मृत्यूपूर्वी सुनंदा पुष्कर यांनी शशी थरूर यांना ई-मेल करून आपल्याला जगायची इच्छा नसल्याचे म्हटले होते. ८ जानेवारी २०१४ रोजी सुनंदा यांनी एक मेल केला. मला कुठल्याही चौकशीची पर्वा नाही. मला जगायचीही इच्छा नाही. मला मरायचे आहे, असे त्यांनी आपल्या ई-मेलमध्ये म्हटले होते.