सुनील ग्रोव्हरने शिखर धवनकडे केली खास मागणी

प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता सुनील ग्रोव्हर हे मनोरंजन क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव आहे. कॉमेडी नाईट्स विथ कपिल आणि द कपिल शर्मा शोमुळे तो घराघरात पोहोचला आहे. सध्या सुनील त्याच्या नवीन वेब शोमुळे चर्चेत आहे. युनायटेड कचे हे त्याच्या नवीनतम वेब शोचे नाव आहे जो नुकताच झी ५ वर प्रदर्शित झाला. दरम्यान, त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये तो सामन्यादरम्यान स्टेडियमवर हातात बोर्ड घेऊन घेत शिखर धवनला आवाहन करताना दिसत आहे.

सुनील ग्रोव्हरची नवी वेबसिरीज ‘युनायटेड कच्चे’ सध्या चर्चेत आहे. ही सिरीज जी ५ वर रिलीज झाली आहे. दरम्यान, सुनीलचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये सुनील क्रिकेट स्टेडियममध्ये उभा आहे. त्याच्या हातात एक बोर्ड आहे ज्यावर लिहिले आहे ‘शिखर भाई, पुढच्या मालिकेत यूकेला घेऊन जा’. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.