पंचवीस लाख निधीचा अधिकार असलेल्या निमंत्रित सदस्याने मधेमधे नाक खुपसू नये.
सुनिल शेळकेंचा माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंना टोला
पुणे l जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मावळ तालुक्यात विद्युत विभागाच्या अंतर्गत अनेक कामे मंजूर झाली आहेत.पालकमंत्री,खासदार, आमदार यांनी लोकप्रतिनिधी म्हणून व संबंधित विभागाचे अधिकारी यांनी सुचविल्यानुसार ही कामे होत असतात.गुरुवारी वडगाव मावळ येथे झालेल्या आढावा बैठकीत जी कामे मंजूर झाली आहेत.त्यासंबंधीची माहिती विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली होती.स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार ही कामे मंजूर करण्यात आली आहेत.आणि या मंजुर झालेल्या कामांबाबत मी माननीय पालकमंत्र्यांचे जाहीर आभार देखील व्यक्त केले आहेत.त्यामुळे पंचवीस लाख निधीचा अधिकार असलेल्या निमंत्रित सदस्याने मधेमधे नाक खुपसु नये.असा टोला मावळचे विद्यमान आमदार सुनिल शेळके यांनी माजी राज्यमंत्री व नुकतेच जिल्हा नियोजन समितीवर निमंत्रित सदस्य म्हणून निवड झालेले बाळा भेगडे यांना लगावला आहे.
राज्यात आणि केंद्रात तुमचे सरकार आहे.तुमचे असलेले राजकीय वजन आणि संबंध वापरुन तालुक्यातील जी दहा कामे सुचवली आहेत.ती पूर्ण करण्यासाठी त्याचा उपयोग करावा. किरकोळ कामांमध्ये तुमचा वेळ वाया घालू नये.असा खोचक सल्ला देखील दिला आहे.