नवी दिल्ली : आयोध्येतल्या राममंदिर खटल्याबाबतच्या सुनावणीचा आज शेवटचा दिवस आहे. या खटल्यातले पक्षकार असलेल्या सुन्नी वक्फ बोर्डाने या वादग्रस्त जमिनिवरील दावा सोडला आहे. त्यामुळे सुन्नी वक्फ बोर्ड याप्रकरणी आपली याचिका मागे घेणार आहे. याबाबत मध्यस्थ समितीला प्रतिज्ञापत्र पाठवला आहे. मध्यस्थ समितीच्या तीन जणांपैकी एक असलेल्या श्रीराम पंचू यांना सुन्नी वक्फ बोर्डाने हे प्रतिज्ञापत्र पाठविले आहे. राम जन्मभूमी खटल्याच्या युक्तिवादाचा आज अखेरचा दिवस आहे. त्यामुळे अखरेच्या टप्प्यात या खटल्याला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे.
सुन्नी वक्फ बोर्डाने अयोध्या प्रकरण सर्वोच्च न्यायालयातून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. लवादाच्या अध्यक्षांनी लवाद समितीचे सदस्य श्रीराम पंचू यांना हे प्रकरण मागे घेण्याचे प्रतिज्ञापत्र पाठविले. दरम्यान, अयोध्या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू झाली आहे. मात्र, सुन्नी वक्फ बोर्डाचे अपील मागे घेण्याबाबत कोर्टात चर्चा झालेली नाही. आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हा वाद पूर्ण होईल, असे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी स्पष्ट केले. सरन्यायाधीशांनी निर्णय घेतलेल्या पक्षांव्यतिरिक्त कोणाचाही हस्तक्षेप करण्यास परवानगी नाकारली. हिंदू बाजूचे वकील सीएस वैद्यनाथन यांनी चर्चेला सुरुवात केली.