मुंबई : आपल्या हॉट आणि बोल्ड अंदाजामुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी सध्या स्वतःच्याच बायोपिकच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तिच्या बायोपिकचे नाव आहे ‘करनजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लियोन.’ या सिनेमातून सनी लियोनी आपल्या आयुष्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टींचा उलघडा करणार आहे.
या दरम्यान सनीने एक फोटो शेअर केला आहे. या सिनेमाचे शूटिंग साऊथ आफ्रिकेत सुरु आहे. या शूटिंग दरम्यानचा क्लिपबोर्ड सहीत एक फोटो सनीने सोशल मीडियावर शेअर केला. आयुष्यातील त्या निर्णयाबद्दल अपराधी वाटत असल्याचे तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे. बॉलिवूडमध्ये पर्दापण करण्यापूर्वी ती एक प्रसिद्ध पार्नस्टार होती. सनीचे हे छोटेसे कॅप्शन खूप काही सांगते. आता तिच्या या बायोपिकबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.