नवी दिल्ली-बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन याचा आगामी चित्रपट ‘सुपर 30’ दीर्घकाळापासून रखडला आहे. अखेर प्रदर्शनाला मुहूर्त लाभला असून २६ जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आधी या चित्रपटाचा दिग्दर्शक विकास बहल ‘मीटू’च्या आरोपांत अडकला आणि त्याला या चित्रपटातून बाहेर काढण्यात आल्यामुळे ‘सुपर 30’ रखडला. यानंतर कंगना राणौतच्या ‘मणिकर्णिका – द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटामुळे ‘सुपर 30’ रिलीज डेट बदलण्यात आली. पण आता या चित्रपटाची तारीख निश्चित डेट फायनल करण्यात आली आहे.
‘सुपर 30’ हा चित्रपट गणितज्ज्ञ आनंद कुमार यांच्या आयुष्यावर बेतलेला चित्रपट आहे. आनंद कुमार बिहारात ‘सुपर 30’ नावाचा एक अभियान चालवतात. या अभियाना अंतर्गत आनंद कुमार यांनी आत्तापर्यंत अनेक गरिब व होतकरू मुलांना नि:शुल्क शिकवून त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे. जे विद्यार्थी अतिशय हुशार आहेत परंतु आर्थिक अडचणींमुळे आयआयटीच्या परीक्षा देऊ शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांना आनंद कुमार संधी देतात. आनंद १९९२मध्ये गणित हा विषय शिकवायला सुरवात केली होती त्यावेळेस त्यांनी सुरवातीला महिना ५०० रुपये देऊन भाड्याच्या खोलीत शिकवायला सुरवात केली होती. पण नंतरच्या २ वर्षात याच्याकडे २ विद्यार्थ्यांपासून ३६ विद्यार्थी झाले आणि नंतर त्याच्याकडील विद्यार्थ्यांची संख्या ५०० वर गेली. पुढे त्यांनी ‘सुपर 30’ ची सुरवात केली.